Tuesday, 6 December 2022

काय राव प्लास्टिक पिता का सूप ?

आज जिकडे बघाव तिकडे सर्वजण प्लास्टिकच्या कपामध्ये चहा पितात दुसरीकडे हॉटेलमध्ये गेला तुम्हाला प्लास्टिकच्या ताटामध्ये गरम भाजी तसेच गरम सूप सुद्धा प्लास्टिकच्याच वाटीमध्ये भेटते इतकेच काय तर बरेच जण गरम चहा प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये करून नंतर हा चहा प्लास्टिक कपामध्ये पितात.
यामध्ये आपण सर्व एक गोष्ट विसरत आहोत की प्लास्टिक हे ५५ डिग्री तापमानाच्या वर विरघळते .किती सोप्या पद्धतीने आपण प्लास्टिक खातो इतके दिवस गाय खात होती आज आपण खात आहोत   .
माझे खोटे वाटत असेल तर हार्वड या संस्थेने ( नामांकित विद्यापीठाने ) संशोधन करून खालील आर्टिकल लिहिलेले आहे ते जरूर वाचावे.
https://www.health.harvard.edu/staying-healthy/is-plastic-a-threat-to-your-health#:~:text=Some%20of%20these%20chemicals%20have,plastic%20is%20exposed%20to%20heat.
प्लास्टिक मध्ये बीपीएच BPH  नावाचा घटक असतो जो घटक , हाडे ठिसूळ होणे , हृदयरोग ,  किडनी रोग, आणि नपुसकता या पेक्षा खूप भयानक रोगांना कारणीभूत ठरतो ( वरील रिपोर्ट वाचवा) 
त्यामुळे ग्राहकांनी हॉटेलमध्ये गेल्यास स्टीलची प्लेट हक्काने मागावी . सोबतच लग्न कार्यामध्ये प्लास्टिकच्या पत्रावाळी मध्ये न जेवण करता तेथे सुद्धा स्टीलचाच आग्रा करावा आहो लाखो रुपये खर्चता आणि जेवण्यासाठी दहा पंधरा रुपयाच्या प्लास्टिक मुळे आरोग्य खराब करण्यात काय अर्थ आहे .

बदल आपल्या पासून सुरू होतो ....
आपल्याला कुठून तरी सुरुवात करावी लागेल त्याची सुरुवात चहापेपरकप पासून  होते काय होतं जर आपण काचाचा ग्लास किंवा चिनी मातीचा कप मागितला तर तुमच्या माहितीस्तव जो पेपर कप तुम्ही वापरता त्यामध्ये सर्वात जास्त केमिकल असतात  हा कप अक्षरंशहा रद्दी ला भिजवून त्यात पाढरा रंग टाकून नंतर त्याला  मशीन मध्ये मोल्ड करून बनवले जातात विचार करा तुम्ही काय पित आहात ? 

दुसरे :- जेवणामध्ये जी प्लास्टिक पत्रावळी आपण वापरतो ती तर  रस्त्याच्या कडेला जे प्लास्टिक पडतं त्याला गोळा करून त्याला मोल्ड करून म्हणजे वितळून एका साच्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये सिल्वर कलरचा रंग किंवा हिरवा रंग मिसळून तयार केली जाते किती वाईट प्रकार ..हो हे तुम्हाला समजणार नाही कारण तुम्ही हे कसे तयार होते याकडे लक्ष दिले नाही किंवा त्याची शहानिशा केली नाही . आज आपले जे खातो त्या मध्ये खूप कमी पोष्टिक घटक आहेत सोबतच मध्ये प्लास्टिक  असे करून आपण  आरोग्य आणि पैसा दोघांचाही अपवव्य करून.. कुठे जात आहोत याचा विचार करावा?

काय करायला पाहिजे :- 
१. हॉटेल मध्ये गेल्यास बिनधास्तपणे हॉटेल मालकाला स्टीलची प्लेट मध्ये जेवण मागणे .
२. लग्नामध्ये केटरिंग किंवा जो कोणी जेवण देत आहे त्याला प्लास्टिक पत्रावळी यापेक्षा कमळाची / केळी पत्रवळी किंवा सरळ स्टीलच्या ताटामध्ये जेवण द्या असा आग्रह धरणे
३. टपरीवर पेपर कप न वापरता सरळ त्याला स्टीलचा कपडे किंवा काचेचा ग्लास दे किंवा चिनीमातीच्या कपामध्ये चहा द
 असा आग्रह करणे
४. घरात सुद्धा स्टीलचे भांडे आणि लोखंडाची कडई वापरणे (कारण आजकाल प्लास्टिक , नॉन स्टिक ची फॅशन आहे कारण या भांडी युरोप मध्ये बंद आहेत ) 


अझोस्ट्रोबीयम (Azoxystrobium) या बुरशीनाशकाची ओळख :- रविंद्र बोटवे

आज आपण जगातील खूप प्रसिद्ध असणारे अझोस्ट्रोबीयम (Azoxystrobium) या बुरशीनाशकाची ओळख करून घेणार आहोत.

कुठे सापडले :- 
एकदा जर्मनीमधील शास्त्रज्ञ मंडळी जंगलात फिरत असताना त्यांना स्ट्रोबीयम टेनोसेलस या नावाचे मशरूम सापडले त्यांना असे आढळून आले की या मशरूमच्या बाजूला कोणतीही वनस्पती वाढलेली नव्हती आणि या मशरूम वर कोणत्याही प्रकारचा रोग सुद्धा नव्हता . त्यावरून त्यांनी या मशरूमचा अभ्यास सुरू केला . त्यांनी या मधील १४०० घटकांचा अभ्यास करून अझोस्ट्रोबीयम हे संयुक्त बाहेर काढले.

वापर:- 
या बुरशीनाशकाला १९९६ मध्ये मार्केटमध्ये अमीस्टार या नावाने विकण्यास सुरुवात झाली . आज हे 40 पेक्षा जास्त देश आणि 50 पेक्षा जास्त पिकावर वापरले जाते. या बुरशीनाशकाची विक्री १,०००,०००किलो एवढी झाली आहे तर त्याची बाजारातील उलाढाल ५ लाख करोड पेक्षा सुद्धा जास्त आहे. जगामध्ये हे बुरशीनाशक प्रामुख्याने गहू , कापूस कांदा , आणि भाजीपाला या पिकावर वापरले जाते .

हे कसे काम करते :-
हे औषध झाडावरील बुरशीची वाढ त्याच्या अंगात जी ऊर्जा निर्मिती होते त्यामधील तंत्र हे बंद करते त्यामुळे ही बुरशी झाडावर वाढत नाही आणि त्यांची पुढची पिढी याची निर्मिती थांबते.
हे झाडाच्या आत  कसे काम करते :-
हे बुरशीनाशक झाडांच्या पानांद्वारे शोषण करते आणि झाडामधील ज्या पाणी वाहन करणाऱ्या शिऱ्या आहेत यांच्यात मिसळून पूर्णझाडात पसरते मुळे ज्या भागात बुरशी वाढलेली आहे तिथे तेथे तिला मारून टाकते आणि नंतर झाडांच्या इतर भागावर बुरशी येऊ नये म्हणून त्याचे  संरक्षण करते .
हे बुरशीनाशकाची फवारणी केल्यानंतर कमीत कमी 21 दिवस ते 28 दिवस झाडावरील बुरशीजन्य रोगापासून संरक्षण मिळते (हे रोगाचे प्रमाण त्या भागातील हवामान आणि आपण फवारणी कशी करतो यावर अवलंबून आहे).

लवकर निकामी न होवू नये :- 
 बाजारात हे औषध लवकर निकामी होऊ नये साठी जर हा घटक एकटा न विकता त्याला  त्याचा दोस्त बुरशीनाशक ग्रुप ट्रायझोल साथीदार असतो.

बाजारात याची नावे 
१. सिजेंटा चे अमिस्टार
२. Upl चे अवांसर ग्लो
३. अडमा कस्टोडया 
४. पारिजात चे परिझॉक्स

काळजी:- 
१. हे औषध फवारणी केल्यानंतर कमीत कमी सात दिवस जास्तीत जास्त पंधरा दिवस फळांची काढणी किंवा तोडणी करू नये त्यासाठी हे औषध पिकांवर कमीत कमी एक महिना पूर्वी फवारणी करावी म्हणजे झाडांमध्ये याचा अंश सापडणार नाही.
२. या औषधाची कोणत्याही झाडाच्या बुडाला आवळणे करणे टाळावे कारण हे औषध मातीमध्ये राहते पाऊस पडल्यावर हे पाण्यामध्ये मिसळून नदी आणि समुद्रातील जीव जंतू वर घातक परिणाम करते