कुठे सापडले :-
एकदा जर्मनीमधील शास्त्रज्ञ मंडळी जंगलात फिरत असताना त्यांना स्ट्रोबीयम टेनोसेलस या नावाचे मशरूम सापडले त्यांना असे आढळून आले की या मशरूमच्या बाजूला कोणतीही वनस्पती वाढलेली नव्हती आणि या मशरूम वर कोणत्याही प्रकारचा रोग सुद्धा नव्हता . त्यावरून त्यांनी या मशरूमचा अभ्यास सुरू केला . त्यांनी या मधील १४०० घटकांचा अभ्यास करून अझोस्ट्रोबीयम हे संयुक्त बाहेर काढले.
वापर:-
या बुरशीनाशकाला १९९६ मध्ये मार्केटमध्ये अमीस्टार या नावाने विकण्यास सुरुवात झाली . आज हे 40 पेक्षा जास्त देश आणि 50 पेक्षा जास्त पिकावर वापरले जाते. या बुरशीनाशकाची विक्री १,०००,०००किलो एवढी झाली आहे तर त्याची बाजारातील उलाढाल ५ लाख करोड पेक्षा सुद्धा जास्त आहे. जगामध्ये हे बुरशीनाशक प्रामुख्याने गहू , कापूस कांदा , आणि भाजीपाला या पिकावर वापरले जाते .
हे कसे काम करते :-
हे औषध झाडावरील बुरशीची वाढ त्याच्या अंगात जी ऊर्जा निर्मिती होते त्यामधील तंत्र हे बंद करते त्यामुळे ही बुरशी झाडावर वाढत नाही आणि त्यांची पुढची पिढी याची निर्मिती थांबते.
हे झाडाच्या आत कसे काम करते :-
हे बुरशीनाशक झाडांच्या पानांद्वारे शोषण करते आणि झाडामधील ज्या पाणी वाहन करणाऱ्या शिऱ्या आहेत यांच्यात मिसळून पूर्णझाडात पसरते मुळे ज्या भागात बुरशी वाढलेली आहे तिथे तेथे तिला मारून टाकते आणि नंतर झाडांच्या इतर भागावर बुरशी येऊ नये म्हणून त्याचे संरक्षण करते .
हे बुरशीनाशकाची फवारणी केल्यानंतर कमीत कमी 21 दिवस ते 28 दिवस झाडावरील बुरशीजन्य रोगापासून संरक्षण मिळते (हे रोगाचे प्रमाण त्या भागातील हवामान आणि आपण फवारणी कशी करतो यावर अवलंबून आहे).
लवकर निकामी न होवू नये :-
बाजारात हे औषध लवकर निकामी होऊ नये साठी जर हा घटक एकटा न विकता त्याला त्याचा दोस्त बुरशीनाशक ग्रुप ट्रायझोल साथीदार असतो.
बाजारात याची नावे
१. सिजेंटा चे अमिस्टार
२. Upl चे अवांसर ग्लो
३. अडमा कस्टोडया
४. पारिजात चे परिझॉक्स
काळजी:-
१. हे औषध फवारणी केल्यानंतर कमीत कमी सात दिवस जास्तीत जास्त पंधरा दिवस फळांची काढणी किंवा तोडणी करू नये त्यासाठी हे औषध पिकांवर कमीत कमी एक महिना पूर्वी फवारणी करावी म्हणजे झाडांमध्ये याचा अंश सापडणार नाही.
२. या औषधाची कोणत्याही झाडाच्या बुडाला आवळणे करणे टाळावे कारण हे औषध मातीमध्ये राहते पाऊस पडल्यावर हे पाण्यामध्ये मिसळून नदी आणि समुद्रातील जीव जंतू वर घातक परिणाम करते
No comments:
Post a Comment